नाशिक- नागपूर ते मुंबई असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांवर आणणाऱ्या कै. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर म्हटले जाणार आहे. तसा भाजपच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचादेखील कॉरिडॉर ठरणार आहे. समृद्धी महामार्गावर मुंबई, ठाणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकांचा समावेश होत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने येथील मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे.