नाशिक - राज्य शासनाने सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचा प्रस्ताव राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे. राज्यपालांची येत्या दोन दिवसांत स्वाक्षरी झाल्यानंतर प्राधिकरणाच्या प्रस्तावाला मूर्तरूप प्राप्त होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. एकदा प्राधिकरण गठीत होताच सिंहस्थाच्या कामांना गती मिळू शकेल.