

Nashik
esakal
रोशन खैरनार
सटाणा ता.५ : महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविणाऱ्या रुग्णालयांकडून लाभार्थ्यांची दिशाभूल, अतिरिक्त शुल्क आकारणी आणि शासनाच्या नियमांचे होत असलेले कथित उल्लंघन तातडीने थांबविण्यात यावे, तसेच पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पूर्णपणे मोफत उपचार मिळावेत, यासाठी बागलाण तालुका महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन यांच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.