खडतर प्रवासातून यश! सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून वेगळी ओळख! खडतर प्रवासातून यश
mahendra aher
mahendra aheresakal

भऊर (जि.नाशिक) : न्यायप्रिय, प्रामाणिक, कार्यतत्पर, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामकाजाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्याकडे असलेल्या गुन्ह्यांची (crime) त्यांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई (poilce action) करून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक स्तरावर शांतता राखणे, जातीय सलोखा राखणे, गुन्ह्यांची उकल होण्याकरीता आपल्या प्रशासकीय कारकीर्दीतील संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. (selected as Assistant Inspector of Police)

भऊरच्या भूमिपुत्राची सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

पिंप्री चिंचवड (जि. पुणे) येथील पोलिस उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांची नुकतीच सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती झाली असून, नागपूर शहरात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महेंद्र कारभारी आहेर भऊर (ता. देवळा) येथील भूमिपुत्र असून, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्त्व आहे. भऊर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पूर्ण करून त्यांनी देवळा येथे उच्च शिक्षण घेतले. आपल्या खडतर प्रवासातून त्यांनी यश मिळविले.

mahendra aher
VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून वेगळी ओळख

गेल्या आठ वर्षांपासून पिंप्री चिंचवड पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून महेंद्र आहेर कार्यरत आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरला असून, अवैध धंदे, तसेच गुंडगिरी मोडीत काढण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले आहे. एक कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

संपूर्ण ताकद पणाला

न्यायप्रिय, प्रामाणिक, कार्यतत्पर, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामकाजाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्याकडे असलेल्या गुन्ह्यांची त्यांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक स्तरावर शांतता राखणे, जातीय सलोखा राखणे, गुन्ह्यांची उकल होण्याकरीता आपल्या प्रशासकीय कारकीर्दीतील संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी आपला वचक कायम
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी आपली कारकीर्द गाजविली आहे. महेंद्र आहेर यांनी विविध प्रकारची आंदोलने, मोर्चा, तसेच सण, उत्सव यशस्वी हाताळून तालुक्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. पिंप्री चिंचवड शहर व तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी आपला वचक कायम ठेवला. त्यांची नुकतीच नागपूर येथे सहाय्यक पोलिस निरीक्षकपदावर पदोन्नती झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी बढती झाल्याने भऊर येथील सरपंच दादा मोरे, माजी सरपंच कारभारी पवार, उपसरपंच योगिता पवार, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन पवार, पोलिसपाटील भरत पवार, देवळा कृषी बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, देवळा तालुक्यातील शिवसेना अध्यक्ष सुनील पवार, दादाजी पवार, सायली एंटरप्राइजेसचे संचालक कौतिक पवार, जगन पवार, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त रामदास आहेर, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ पवार, भऊर येथील प्रगतिशील शेतकरी सुधाकर पवार, प्रहार संघटनेचे शाखाध्यक्ष सुभाष पवार, केदा पवार, विलास पवार, दिनेश पवार, प्रशांत पवार, बापू गरुड आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. (selected as Assistant Inspector of Police)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com