esakal | जिल्ह्यातील खरीप हंगाम; कसमादेमध्ये मकालागवड ते विक्री प्रकल्प राबविणार
sakal

बोलून बातमी शोधा

farmers

जिल्ह्यातील खरीप हंगाम; विक्री प्रकल्प राबविणार

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना काळातील(Corona virus) यंदाचा खरीप हंगाम वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यादृष्टीने कृषी विभागाने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कसमादे पट्ट्यात मक्याच्या लागवडीपासून विक्रीपर्यंत ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’वर(Public Private Partnership) भर देण्याचे ठरविले आहे. खरे म्हणजे, ‘पोल्ट्री इंडस्ट्री’(Poultry Industry) तर्फे मक्याच्या लागवडीपासून विक्रीपर्यंतची व्यवस्था याच पट्ट्याप्रमाणे जिल्ह्यात करार पद्धतीद्वारे राबविण्यात येणार असल्याने त्यात कृषी विभागाचा नेमका सहभाग कसा राहणार, हा जिल्हावासीयांच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय बनला आहे. (Maize cultivation to sale project implement in Kasmade)

शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश

जिल्ह्यात गेल्या वर्षामध्ये कडधान्याचे(Cereals) क्षेत्र वाढले आहे. आंतरपीक म्हणून कडधान्याचा समावेश शेतकऱ्यांनी केल्याने उत्पादनवाढीसह शाश्‍वतता दिसून आली आहे. त्यामुळे कृषी विभागाने यंदाही आंतरपीक म्हणून कडधान्यावर भर देण्याचे ठरविले आहे. कपाशीमध्ये मूग, उडीद याच्यावर आंतरपीक म्हणून भर देण्यात येणार आहे. कडधान्यासाठी ३९ हजार हेक्टरचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय मक्याचे दोन लाख ४४ हजार, सोयाबीनचे ८८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. पावसाचा खंड पडल्यास सोयाबीनसाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश या विभागाचा आहे.

हेही वाचा: अजित पवार म्हणाले, तुमच्या स्वप्नातल्या घराची लॉटरी लागेल!

गावनिहाय कृषिविकास आराखडा
कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठी ठरविण्यात आलेल्या वैशिष्ट्यांमध्ये ग्रामपंचायतस्तरावर ग्राम कृषिविकास समितीची स्थापना करण्याचे ठरविले आहे. याशिवाय प्रत्येक गावाचा ग्राम कृषिविकास आराखडा करण्याचे निश्‍चित केले आहे. महिलांसाठी शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत. खरीप पीक उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी मोहीम राबविण्याचा या विभागाचा मानस आहे. आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड वाढावी म्हणून सुरगाणा, दिंडोरी, कळवण तालुक्यात रोपनिर्मिती आणि विक्रीला चालना देण्यात येणार आहे.

पेरणी क्षेत्राची माहिती

-जिल्ह्याचे सर्वसाधारण खरीप क्षेत्र : ६ लाख ६६ हजार हेक्टर
- यंदाच्या खरिपासाठी पेरणीचे उद्दिष्ट : ६ लाख ६२ हजार हेक्टर
- गळीत धान्य पेरणी प्रस्तावित : १ लाख १९ हजार हेक्टर
- बाजरीची पेरणी प्रस्तावित : ८९ हजार हेक्टर
- भात लागवडीचे उद्दिष्ट : ९५ हजार हेक्टर

हेही वाचा: तिसऱ्या लाटेपूर्वीच जिल्ह्यात कार्यान्वित होणार ऑक्सिजन प्लांट

loading image