तिसऱ्या लाटेपूर्वीच नाशिक जिल्ह्यात कार्यान्वित होणार ऑक्सिजन प्लांट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन प्लांट

तिसऱ्या लाटेपूर्वीच जिल्ह्यात कार्यान्वित होणार ऑक्सिजन प्लांट

नाशिक : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या(Corona third wave) पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा आतापासूनच तयारीला लागली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात ३२ रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या लाटेपूर्वीच म्हणजे १५ जूनपर्यंत ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. (The oxygen plant starts in the district before the third wave)

ऑक्सिजन तुटवड्यावरून जिल्ह्यात प्रचंड आक्रोश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गैरसोय झाली. कोरोनाची संख्या वाढत असताना त्याप्रमाणात बेड उपलब्ध होईना, रेमडेसिव्हिरसह(Remdesivir) अनेक इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने त्याचा काळा बाजार झाला. एक वेळ अशी होती, की ऑक्सिजन(Oxygen) नसल्याने रुग्णांना रुग्णालयातून घरी जाण्याचे सल्ले दिले जाऊ लागले. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या या प्रकाराला तोंड देण्यासाठी ऐनवेळी ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे(Oxygen express) लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन(Liquid Oxygen) मागवावा लागला. ऑक्सिजन तुटवड्यावरून जिल्ह्यात प्रचंड आक्रोश झाला.

हेही वाचा: ...त्या दिवशी अग्निशामक विभागात खणाणले सुमारे 63 कॉल!

जूनपर्यंत ऑक्सिजन

जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती, केंद्र शासन, खासदार हेमंत गोडसे यांचा स्थानिक विकास निधी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएरआर) एकूण ३२ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतल्याने त्यातील २४ प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी प्राप्त झाला आहे. जूनपर्यंत तिसरी लाट येण्‍याची शक्यता नाही. आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार १५ जूनपर्यंत हे सगळे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजननिर्मिती उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट

जिल्हा नियोजन समिती - २४

केंद्र शासनाचा निधी - ०४

सीएरआर निधीतून - ०३

खासदार गोडसे स्थानीक निधी - ०१

''तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज आहे. त्यादृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम सुरू झाले आहे. साधारण १५ जूनपर्यंत सगळे प्लांट तयार होतील. अपवादात्मक परिस्थितीत थोडेफार पुढे-मागे होईल. पण जूनअखेर डीपीडीसीतील(DPDC) २४ प्लांट सुरू होतील.''

- डॉ. अशोक थोरात (जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक)

हेही वाचा: 'PM मोदींनी इतर राज्यावर अन्याय केला नाही'

''जिल्ह्यातील ३२ रुग्णालयांसाठी जिल्हा नियोजन समितीतून २७ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मंजुरी मिळाल्याने ऑक्सिजन प्लांटचे मोठे कामकाज होणार आहे. कायमस्वरूपी रुग्णालयामुळे ही सोय होणार आहे.''

- किरण जोशी (जिल्हा नियोजन अधिकारी, नाशिक)

loading image
go to top