Maize Price : मक्याचा भाव मार्चपर्यंत 2 हजारांवरचा राहण्याचा अंदाज; ‘स्मार्ट'चा अंदाज

Maize Prices News
Maize Prices Newsesakal

नाशिक : शेतमालाच्या जानेवारी ते मार्च २०२३ चा संभाव्य किंमतीचा अहवाल बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) च्या बाजार माहिती विश्‍लेषण व जोखीम निवारण कक्षातर्फे गेल्या महिन्यात जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मक्याचा भाव २ हजारांवरचा राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज मुंबईत मक्याला क्विंटलला तीन हजार, तर पुण्यामध्ये २ हजार ४५० रुपये असा भाव मिळाला. (Maize Price price of maize expected to be above 2 thousand till March Smart prediction Nashik News)

‘स्मार्ट'च्या अंदाजानुसार २० मार्च २०२३ पर्यंत छिंदवाडामध्ये २ हजार २४९, तर नांदगावमध्ये १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. लासलगावमध्ये बुधवारी (ता. ७) ४ हजार ५७० क्विंटल मक्याची आवक झाली होती. त्यास कमाल २ हजार ११२ आणि सरासरी २ हजार ५० रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. आज ४ हजार क्विंटल आवक झालेल्या मक्याला कमाल २ हजार ९१ आणि सरासरी २ हजार रुपये असा भाव राहिला. अमळनेरमध्ये २ हजार ५१, बारामती मध्ये २ हजार १३५, कळवणमध्ये २ हजार ५० रुपये क्विंटल असा सरासरी भाव आज होता.

दरम्यान, देशात यंदा ३२ दशलक्ष टन मक्याच्या उत्पादनाचा अंदाज असून गेल्यावर्षी देशात ३३ दशलक्ष टन मक्याचे उत्पादन झाले होते. यंदाच्या खरिपात देशात २३.१० दशलक्ष टन मक्याचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्यावर्षीच्या खरीपामध्ये २२.६० दशलक्ष टन मक्याचे उत्पादन झाले होते. मक्याला कोरोना काळात क्विंटलला सरासरी बाराशे ते तेराशे रुपये असा भाव मिळाला होता. त्यानंतर गेल्यावर्षीच्या रब्बीतील मक्याला दोन हजार रुपयांच्या आसपास भाव मिळतो आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बीमध्ये देशात मक्याचे १२.५० दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित असल्याचे बाजारपेठीय अभ्यासक दीपक चव्हाण यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

Maize Prices News
Nashik Bus Accident: ''दैव बलवत्तर म्हणून दार उघडले नाहीतर...'' प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

भारतासह ५ देशात ७६ टक्के उत्पादन

अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना, भारत या देशांमध्ये मक्याचे जगातील उत्पादनाच्या ७६ टक्के उत्पादन होते. यंदा जगात ११६८.७४ दशलक्ष टन उत्पादनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी मक्याच्या उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्यावर्षी जगात १२१७.३० दशलक्ष टन मक्याचे उत्पादन झाले होते. मुळातच, देशात मक्याची यंदाची आधारभूत किंमत क्विंटलला १ हजार ९६२ रुपये आहे.

नांदगावमध्ये ऑगस्ट २०२२ मध्ये २ हजार ३२४ आणि ऑक्टोबरमध्ये १ हजार ७४० रुपये क्विंटल असा मक्याला भाव मिळाला होता. याशिवाय गेल्यावर्षी ३५ लाख टन मक्याची निर्यात झाली होती. एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२२ पर्यंत १८ लाख टन मक्याच्या निर्यातितून ४६ हजार ४७९ कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे.

मक्याची सर्वसाधारण गरज

(आकडे टनामध्ये दर्शवितात)

० स्टार्च उद्योग-६० लाख

० कुक्कुटपालन-१६० ते १८० लाख

० खाण्यासाठी-२० ते २५ लाख

(संदर्भ-दीपक चव्हाण यांचा अभ्यास)

Maize Prices News
Nashik : ''ते आमच्या डोळ्यांदेखत होरपळत होते मात्र आम्ही हतबल होतो'', प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com