Ayush Prasad
sakal
चांदोरी: आकाशात रंगीत पतंगांची गर्दी, अंगणात तिळगुळाचा गोडवा आणि मनात नववर्षाची नवी उमेद… मकरसंक्रांत म्हटली की नाशिककरांच्या जीवनात उत्साहाची एक वेगळीच झळाळी येते. पिढ्यान्पिढ्या जपलेला हा पतंगोत्सव केवळ खेळ नाही, तर आपुलकी, आनंद आणि एकत्र येण्याची संस्कृती आहे.