Rahul Dhikale
sakal
पंचवटी: मखमलाबाद नाका ते मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ते मखमलाबाद गाव या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नाशिक महापालिकेने सकारात्मक कार्यवाही न केल्यास तीव्र जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी बैठक घेत केला. परंतु, तत्पूर्वी आमदार ॲड. राहुल ढिकले यांची भेट घेऊन त्यांनाच निवेदन देत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साकडे घालण्यात आले.