नाशिक- मखमलाबाद परिसरातील शांतिनगर भागातील एका सोसायटीत रात्री बंद दरवाजासमोर भानामती, करणी असा अंधश्रद्धा आणि भीती पसरविण्याचा प्रकार घडला. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे केलेल्या प्रबोधनानंतर घरमालक असलेल्या महिलेने स्वतःदारापुढे टाकलेली अस्थी व राख जमा केली. अंनिसचे कार्यकर्ते व पोलिस यावेळी उपस्थित होते.