प्रभाग 20च्या प्रारूप यादीत 900 मतदारांचा घोळ

draft voters list of nmc election
draft voters list of nmc election esakal

जुने नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीनिमित्त (NMC Election) महापालिकेकडून प्रारूप मतदारयाद्या (Voter List) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सध्या त्यावर हरकती मागविल्या आहेत. हाजी मुजाहिद शेख यांनी प्रभाग २० प्रारूप यादीवर हरकत दर्शविली आहे. इस्माईल शेख यांनी महापालिकेत अधिकृत हरकत दाखल केली आहे. प्रभाग २० मधील सुमारे ९०० मतदारांच्या नावांचा घोळ झाला आहे. (Ward 20 draft list of fault of 900 voters Nashik News)

draft voters list of nmc election
युकेस्थित हॉटेल ब्रॅंन्‍ड स्‍विस ट्रॅफलार नाशिकमध्ये

त्यातील काही नावांचा प्रभाग १७, तर काही नावे प्रभाग १९ मध्ये समावेश करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुबिन शेख, हुसेन शेख, हमीद शेख, अब्दुललतीफ पटेल, इमरान शेख, साजिद शेख, राशिद खान, सैफ जीन आदी या वेळी उपस्थित होते.

draft voters list of nmc election
Nashik : मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com