Gold Fraud
sakal
नाशिक: ‘मलबार गोल्ड ॲन्ड डायमंड’ कंपनीने नाशिकमध्ये कुरिअरमार्फत ९ लाख ८७ लाख १३० रुपयांचे सहा गोल्डन कॉइन ग्राहकांपर्यंत पोच करण्यासाठी पाठविले असता, ग्राहकाकडून ‘ऑर्डर’ रद्द करण्यात आली. त्यामुळे परत कंपनीकडे आलेल्या पार्सलमध्ये गोल्डन कॉइन नव्हते. याप्रकरणी ‘मलबार’ कंपनीने नाशिक शहर सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.