Advay Hiray
sakal
मालेगाव: शिवसेनेचे (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांनी मंगळवारी (ता. १८) मुंबईत आपल्या समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. हिरे यांच्या घरवापसीमुळे मालेगावात शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हिरे व त्यांच्या समर्थकांचा प्रवेश झाला.