Malegaon News : मालेगाव बाजार समितीतील वाद पेटला; सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

Clash in Malegaon APMC Meeting: Traders vs Chairman : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व सभापती यांच्यात झालेल्या वादानंतर फळ-भाजी बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला
Malegaon business protest
Malegaon business protestsakal
Updated on

मालेगाव- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती चंद्रकांत शेवाळे, फळफळावळ व भाजीपाला व्यापाऱ्यांमध्ये बैठकीत वाद झाला. सभापती शेवाळे यांनी दमबाजी करत शिवीगाळ केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सभापतींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सभापतींनी पदाचा राजीनामा द्यावा, तसेच ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय फळफळावळ व भाजीपाला असोसिएशनने घेतल्याची माहिती अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी दिली. दरम्यान, सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com