ATS Operation
sakal
मालेगाव: मोबाईल व्हॉट्सॲपच्या माध्यमातून परदेशी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून येथील हाफीज तौसिफ असलम शेख (रा. नुमानीनगर मालेगाव) या तरुणाला महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यातील ‘एटीएस’च्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले. येथील पोलिस नियंत्रण कक्षात रात्री उशिरापर्यंत त्याची सखोल चौकशी सुरू होती, या प्रकारामुळे येथे खळबळ उडाली आहे.