Hafiz Sheikh
sakal
नाशिक
Crime News : मालेगावात मोठी कारवाई! टेलर तरुणाला आंध्र प्रदेश एटीएसकडून अटक; काय आहे व्हॉट्सॲप कनेक्शन?
Arrest of Hafiz Sheikh in Malegaon by ATS : मालेगाव येथील नुमानीनगर परिसरात आंध्र प्रदेश एटीएसच्या पथकाने कारवाई करून हाफिज तौसिफ अस्लम शेख या तरुणाला परदेशी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केली. त्याला न्यायालयाच्या आदेशानंतर हैदराबादला नेण्यात आले.
मालेगाव: मोबाईल व्हॉट्सॲपच्या माध्यमातून परदेशी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून येथील हाफिज तौसिफ अस्लम शेख (वय २७, रा. नुमानीनगर, मालेगाव) या तरुणाला ‘एटीएस’च्या आंध्र प्रदेशातील पथकाने सोमवारी (ता. १३) रात्री उशिरा अटक केली. त्याची पाच तासांपेक्षा अधिक कसून चौकशी करण्यात आली.
