मालेगाव: मालेगावी २९ सप्टेंबर २००८ ला भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा निष्पाप नागरीकांना जीव गमवावा लागला. अनेक जखमी झाले. २००८ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मालेगावकरांवर अन्याय झाला आहे. राज्य सरकारने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. तसेच निकाल लागल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष केला. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.