मालेगाव: शहरात २००८ च्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले; तर १०० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. ३१ जुलैला एनआयए विशेष न्यायालयाने निकाल दिला. हा निकाल मालेगावकरांना धक्का देणारा आहे. या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचे ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी येथे सांगितले.