Crime
sakal
मालेगाव: डोंगराळे येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येने उसळलेला संताप अजूनही शांत झालेला नाही. त्यातच मागील आठवड्यात शहरात एक अत्याचार आणि एक विनयभंगाचा गुन्हा नोंदवल्यानंतर सोमवारी (ता. १) पुन्हा रमजानपुरा, वडनेर खाकुर्डी आणि मनमाड या तीन पोलिस ठाण्यांत अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. वाढत्या घटनांमुळे समाजमनातील आक्रोश अधिक तीव्र होत आहे.