मालेगाव: शहरात या आठवडाभरात क्षुल्लक कारणावरून गोळीबार, कटरने वार करणे, लाकडी दांडक्याचा वापर करून मारहाण करण्याचे प्रकार घडले. या आठवड्यात शहरातील पूर्व-पश्चिम भागात चार प्रकार घडले. यात मोतीबाग नाक्याजवळ मारहाणीत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.