मालेगाव- भांडणात मदत केली नाही, याचा राग मनात धरून मालेगावला सराईताने त्याच्या सख्ख्या भावावर गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकील अहमद (वय ४०, रा. के. जी. एन. नगर, मालेगाव) असे या सराईतीचे नाव आहे. सख्ख्या भावावर गोळीबार केला. मात्र त्याला मालेगाव पोलिसांनी चाळीसगावला अटक केली आहे.