Dada Bhuse
sakal
नाशिक
Dada Bhuse : पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी? मालेगाव अत्याचार प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांवर दादा भुसेंचा गंभीर आरोप
Minister Dada Bhuse Addresses Public Protest : मालेगाव येथील चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चात बोलताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तपास अधिकारी उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आणि त्यांच्या बदलीची मागणी केली.
मालेगाव: डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात बोलताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे संताप व्यक्त करताना दिसले. प्रकरणाचे तपास अधिकारी उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या भूमिकेवर त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
