protest
sakal
मालेगाव: डोंगराळे (ता. मालेगाव) येथील सव्वाचारवर्षीय चिमुकलीवर अत्याचार व तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने शहर व तालुका अजूनही सावरलेला नाही. जागोजागी निषेध, संताप व आक्रोश दिसत आहे. निरपराध चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी नराधम आरोपीच्या फाशीच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २१) मालेगावच्या रस्त्यावर जनसागर उसळला. जनआक्रोश मोर्चात महिला व मुलींचा आक्रोश, तरुणांचा संताप या प्रकरणाची दाहकता किती आहे, याची प्रचीती देत होता.