Mohammad Mateenji
sakal
मालेगाव: कुसुंबा रस्त्यावरील एकबाल डाबी येथे यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या १९ वर्षीय युवकाचा धारधार शस्त्राने निर्दयपणे खून केला. रविवारी (ता. २१) रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत दोन संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.