मालेगाव- येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले प्रकरणात अनेक अधिकारी व नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप धारणकर व त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्यावरही काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. फरारी असलेल्या धारणकर दांपत्याला पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. शुक्रवारी (ता. २०) त्यांना न्यायालयात हजर केले असता २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.