Fake Currency
sakal
मालेगाव: शहरात बनावट नोटा प्रकरणी किल्ला पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून साडेपाच लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. बनावट नोटांचा मुख्य सूत्रधार हा वर्धा येथे भाड्याच्या घरात राहत होता. तेथे तो बनावट नोटा तयार करीत असल्याची माहिती वर्धा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य व विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती समजताच मुख्य संशयित आरोपी तेथून फरारी झाला.