Malegaon protest
sakal
मालेगाव: तालुक्यातील चटाणेपाडा चौफुलीजवळ शुक्रवारी (ता. १४) दुपारी रस्त्यावरील काटेरी झुडपे हटविण्याच्या लोकसहभागातील कामास स्थानिक शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य विजय गरुड यांनी विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत चौफुलीवरील रस्त्यावरच झुडपे फेकून तब्बल चार तास वाहतूक ठप्प ठेवत आंदोलन छेडले. अखेरीस गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तंटामुक्त समितीच्या मध्यस्थीमुळे तणाव निवळला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.