विनोद चंदन, मालेगाव कॅम्प: घरगुती भांडणतंटा, तसेच पत्नी मुलीकडे लक्ष देत नसल्याने कंटाळलेल्या एका पित्याने अघोरी पाऊल उचलले. येथील टेहरे- सोयगावदरम्यानच्या गिरणा पुलावरून पाच वर्षांच्या मुलीला गिरणा पात्रात फेकून दिले आणि स्वतःही उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पोहणारे तरुण तेथे असल्याने त्यांनी दोघांना सुखरूप बाहेर काढत वाचविले. रविवारी (ता. २४) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.