Agriculture News : पावसाचा फटका! फळांच्या दरात मोठी वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ हजार कॅरेटची आवक थेट ८०-९० वर
Malegaon Fruit Market Sees Price Surge Amid Reduced Supply : कसमादे परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब व अन्य फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे मालेगावच्या बाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, त्याला उच्चांकी भाव मिळत आहे.
मालेगाव: आठवड्यापासून फळांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वाधिक डाळिंबाला भाव मिळत आहे. येथील बाजारात ८० ते ९० कॅरेट डाळिंब विक्रीला येत आहेत. पेरू, बोर, पपई याची देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.