गॅस टँकरचा अपघात होऊन गॅसगळती; 2 हजार 300 कोंबड्या दगावल्या

अपघाताच्या दुसऱ्या दिवशी कोंबड्या दगावल्याचं समोर आलं आहे.
Poultry Hens
Poultry Hens sakal media

मालेगाव : गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात होऊन तब्बल २ हजार ३०० कोंबड्या दगावल्या आहेत. टँकर उलटून त्यामधून गॅस गळती झाल्याने कोंबड्या दगावल्या असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मालेगावमधील सौंदाणी येथे घडली आहे. या अपघाताच्या दुसऱ्या दिवशी कोंबड्या दगावल्याचं समोर आलं आहे.

(Gas Tanker Accident 2300 Chicken's Death)

शनिवारी गॅस टँकर उलटून अपघात अपघात झाला होता. घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये भरल्या जाणाऱ्या गॅसची वाहतूक करणारा टॅंकर पलटी झाल्याने त्यातून गॅसची गळती झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अपघाताच्या ठिकाणी असलेल्या पोल्ट्रीमधील कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यानंतर गॅसच्या गळतीमुळे गुदमरून कोंबड्या दगावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Poultry Hens
पत्नीला सरकारी नोकरी लागली म्हणून पतीने तिचा हातच तोडला

तब्बल २ हजार ३०० कोंबड्या सोबत दगावल्याने गॅसगळतीमुळेच त्यांच्या मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान तालुका पशु शल्य चिकित्सालय विभागाने मृत कोंबड्यांचे विच्छेदन करून नाशिकच्या मेरी प्रयोगशाळेत त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी दिली आहे.

दरम्यान या घटनेमुळे शेतकरी हरिष अहिरे यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये एकून १० हजार कोंबड्या होत्या. रविवारी दिवसभरात तब्बल २ हजार ३०० कोंबड्या दगावल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com