Candle Marches
sakal
मालेगाव: डोंगराळे (ता. मालेगाव) येथील सव्वाचारवर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घृणास्पद घटनेचे सलग दुसऱ्या दिवशीही सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. समाजातील सर्व स्तरांतून या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून, मोर्चे आणि आंदोलनांद्वारे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी होत आहे.