मालेगावला प्रभागरचनेवर सुनावणी; पूर्व भागातील हरकतीच जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

collector rajendra bharud meeting dicussion & public  waited outside meeting rom

मालेगावला प्रभागरचनेवर सुनावणी; पूर्व भागातील हरकतीच जास्त

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिकेच्या (Municipality) आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी (General election) प्रारूप प्रभागरचना (Ward Formation) ८ जूनला जाहीर करण्यात आली. प्रारूप प्रभागरचनेवर २० जूनपर्यंत ४३ हरकती महापाकिलेच्या निवडणूक शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. २८) शासकीय विश्रामगृहात (Government Guest House) पुण्याच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासमोर सुनावणी झाली. प्रामुख्याने पूर्व भागातील हरकतीच जास्त आढळून आल्या. या भागातील पक्षांचे नेते, पदाधिकारी हरकतींच्या सुनावणीसाठी आवर्जून उपस्थित होते. सुनावणीदरम्यान ४३ पैकी ३७ हरकतदारांनी प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडले. सहा हरकतदार गैरहजर राहिले. (Malegaon hearing on ward formation Nashik News)

डॉ. भारूड, राज्य निवडणूक आयोगाचे अपर सचिव ए. जी. जाधव, कक्ष अधिकारी पी. जी. परब, जीआयएस तज्ज्ञ जावेद अन्सारी, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, दत्तप्रसाद नडे आदी अधिकारी सुनावणीसाठी उपस्थित होते. पोलिसांनी विश्रामगृहावर चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रामुख्याने एकाच प्रभागाचे चार तुकडे करून वेगवेगळ्या प्रभागात समाविष्ट केले. इलेक्ट्रोल ब्लॉक फोडले. प्रभाग रचना करताना डीपी रोड ओलांडले. राजकीय पक्षांच्या दबावाने काही प्रभागांची निर्मिती झाली. प्रभागरचना करताना नियमांचे उल्लंघन झाले. ठराविक नेत्यांच्या सोयीसाठी प्रभागरचना करण्यात आली. मतदारसंख्येचा समतोल नाही, अशा हरकतदारांच्या तक्रारी होत्या. कॅम्प-संगमेश्‍वर भागातील मोजक्याच प्रभागांच्या हरकती होत्या.

सुनावणीदरम्यान प्रभागरचनेबाबत हरकती घेणारे एमआयएमचे डॉ. खालीद परवेज, माजीद युसून ईसा, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष एजाज बेग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल बर्वे, जनता दलाचे रिजवान खान, अब्दुल बाकी, रफीक अहमद, शिवसेनेचे संजय घोडके आदींसह ताजुद्दीन शेख, सगीर अहमद, शफीक अहमद, किरण माेरे आदी उपस्थित होते. महापालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सुहास जगताप, सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, सुनील खडके, सचिन महाले, उपअभियंता सचिन माळवाळ, शांताराम चौरे, जयपाल त्रिभुवन, कनिष्ठ अभियंता महेश गांगुर्डे, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, नगरसचिव साजीद अन्सारी, वरिष्ठ लिपिक शेखर वैद्य, सचिन भामरे, इम्तियाज अहमद, विनय झगडे, प्रवीण पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Nashik Crime : पत्नीच्या मारेकऱ्याला 5 दिवसांची कोठडी

"प्रारूप प्रभागरचनेवर आम्ही प्रभाग २८, २९ व ३२ या तीन प्रभागांसंदर्भात हरकत घेतली आहे. यातील पूर्वाश्रमीच्या प्रभाग २९ चे चार वेगवेगळ्या प्रभागात विभाजन करण्यात आले. या प्रभागरचनेत महापालिकेतील सत्तारुढ नेत्यांचा हस्तक्षेप झाल्याचा संशय आहे अशी तक्रार केली आहे. हरकतीवर सुनावणी झाली. आता प्रतिक्षेशिवाय दुसरे काय करणार."
- डॉ. खालीद परवेज, माजी मनपा गटनेते, एमआयएम

हेही वाचा: अतिक्रमणविरोधी पथक अन् व्यावसायिकांत पाठशिवणीचा खेळ

Web Title: Malegaon Hearing On Ward Formation Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..