Dada Bhuse
sakal
मालेगाव: तालुका व परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील विविध भागात पिकांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. २६) नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.