Nashik News : जुने शॉकअपची दुरुस्तीत मालेगावचा हातखंडा! वाढत्या किमतींमुळे जुन्या शॉकअपला वाढली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asghar Ahmed doing repairs at Pandey Shockup shop near Jafarnagar here.

Nashik News : जुने शॉकअपची दुरुस्तीत मालेगावचा हातखंडा! वाढत्या किमतींमुळे जुन्या शॉकअपला वाढली मागणी

मालेगाव (जि. नाशिक) : जुन्या वस्तू दुरुस्त करण्यात मालेगावकर आघाडीवर असतात. येथे खराब एलईडी लाईट दुरुस्ती, फ्रीज, वॉशिंग मशिन, दुचाकींना कलर करणे, रिक्षा व सर्व प्रकारच्या वाहन दुरुस्तीत येथील कारागिरांचा हातखंडा आहे.

यासह मालेगावात जुने शॉकअप दुरुस्तीचा जुगाड यशस्वी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातून जुने शॉकअप दुरुस्तीसाठी येथे वाहने येत असतात. (Malegaon help in repairing old shockup Demand for older shockups increased due to rising prices Nashik News)

येथे चाळीस वर्षांपासून शॉकअपची दुरुस्ती केली जाते. नवीन शॉकअपच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिकांचा जुने शॉकअप दुरुस्तीकडे कल वाढला आहे. येथे सटाणा, नांदगाव, धुळे, नामपुर, तहाराबाद, चांदवड, देवळा आदींसह उत्तर महाराष्ट्रातून नागरिक शॉकअप दुरुस्तीसाठी नागरिक येतात.

शॉकअपच्या जोडी दुरुस्तीसाठी तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत खर्च येतो. शॉकअपमध्ये लिकेज, खराब झालेले शॉकअप दुरुस्ती होतात. येथे शॉकअप अहमदाबाद, मुंबई व शहरातील भंगार दुकानातून येतात. शॉकअप दुरुस्तीनंतर सहा महिने गॅरंटी दिली जात असल्याने ग्राहकाच्या कल व विश्‍वास वाढला आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

शहरात जाफरनगर, नवीन बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आदी भागात शॉकअप दुरुस्तीची कामे केली जातात. दिवसातून एका दुकानात सुमारे आठ ते दहा शॉकअप दुरुस्ती होतात.

येथील कारागीर वेगवेगळ्या शक्कल लढवून दुरुस्तीचा फंडा अवलंबित आहेत. शहरासह उत्तर महाराष्ट्रातील ग्राहकांची शॉकअप दुरुस्ती करून दिली जात असल्याची माहिती पांडे शॉकअपचे संचालक अब्दुल जब्बार यांनी सांगितले.

"शॉकअप दुरुस्तीत आमची दुसरी पिढी आहे. वडिलांनी प्रथमच शहरात शॉकअप दुरुस्तीचे दुकान सुरु केले होते. त्यांनी असंख्य कारागीर घडविले."

- असगर अहमद, पांडे शॉकअपचे संचालक

टॅग्स :MalegaonNashik