
Nashik News : रेल्वेची महिन्याभरात 142 कोटींची कमाई
मनमाड (जि. नाशिक) : भुसावळ विभागातील वाणिज्य शाखेने प्रवासी रेल्वे गाड्या मालवाहतूक गाड्या तसेच प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा माध्यमातून गेल्या महिन्याभरात १४२.५३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
तर गेल्या वर्षी सन २०२१ मधल्या जानेवारी महिन्यात हीच कमाई १००.२२ कोटी इतकी होती. यंदाच्या वर्षात ४१ टक्के इतके उत्पन्न वाढले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिले आहे. (Railways revenue of 142 crores in month Nashik News)
भुसावळ विभागात धावणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यातून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ३३ कोटी ८५ लाख कोटी इतकी होती. तर यंदा १०० दुप्पट होऊन ६८.१४ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मालवाहतुकीतून ६५ कोटी ३१ लाख,
पार्किंग मधून ५४ लाख, तिकीट तपासणीतून ३ कोटी ५८ लाख कोटी,प्रसिद्धी, जाहिराती आणि इतर मधून ७५ लाख, खानपान विभागातून १ कोटी १८ लाख रुपये महसूल भुसावळ वाणिज्य विभागाला मिळाला आहे.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
कांदा वाहतुकीतून साडेतीनकोटीचा महसूल
मालगाडीतून कांदा वाहतूकमधून ३ कोटी ६४ लाख रूपये महसूल मिळाला. मनमाड, लासलगाव, निफाड, अंकाई किल्ला येथील मालधक्यातून भरून भारतातील इतर प्रांतात जातो. भुसावळ विभागातील अंकाई किल्ला स्टेशन येथे नवीन मालधक्का उघडण्यात आला.
या मालधक्कातील पहिला कांदा रेक १४ जानेवारी रोजी बाराचक जंक्शन स्टेशन आसनसोल विभाग पूर्व रेल्वेसाठी लोड करण्यात आला. त्यातून १८ लाख ४६ हजार रुपयांचा महसूल मिळाला. विभागातील १२ स्थानकांमधून जाहिरातीद्वारे ३ वर्षांसाठी दरवर्षी १२ कोटी ३० लाख महसूल प्राप्त होणार आहे.