मालेगाव: इन्स्टाग्रामवर खोटे अकाउंट तयार करून नोटा दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत २० हजारांच्या बदल्यात १ लाख ४० हजार रुपये देतो, असे सांगून एका अल्पवयीनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात फसवणूक, अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींपैकी काहींना अटक झाली आहे.