Dam
sakal
मालेगाव: तालुक्यासह कसमादे परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषतः चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. धरणातून १२ हजार ४०६ क्यूसेक पाणी गिरणा नदीपात्रात वाहत आहे. गिरणा नदीला मोठा पूर आला असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.