Onion
sakal
मालेगाव: ‘कसमादे’ परिसरात शेतकरी कांद्याची लागवड करतात. गेल्या वर्षांपेक्षा २०२५ मध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची विक्रमी लागवड केली होती. भाव मिळेल, या आशेने ‘कसमादे’ परिसरातील शेतकरी बांधवांनी डिसेंबरपर्यंत कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. ‘नाफेड’ने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून परराज्यात स्वस्तात कांदा विकला. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.