Tajuddin Baba Dargah devotee death Maharashtra
esakal
मालेगाव (नाशिक) : येथील साजिद खान मुन्नवर खान (वय ४९, मदनीनगर) हे मित्रांसोबत नागपूर येथील ताजुद्दिन बाबा दर्ग्यावर दर्शनासाठी गेल्यानंतर अपघाती मृत्यू (Malegaon Accidental Death) झाला. ओळख न पटल्याने नागपूर येथील बुटी बोरी पोलीस ठाण्यात आकस्मिक नोंद करून नागपूर कब्रस्तानात त्यांच्यावर दफन करण्यात आले होते. मात्र कायदेशीर प्रक्रियेनंतर मालेगाव येथील बडा कब्रस्तानात सोमवारी (ता. २) दफन करण्यात आले.