Malegaon road accident
sakal
मालेगाव: मालेगाव-मनमाड रस्त्यावरील वऱ्हाणे शिवारात रविवारी (ता. १८) मध्यरात्री भीषण अपघात झाला. पुण्याहून मालेगावकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सने पुण्याकडे जाणाऱ्या पिक-अप वाहनाला जोराची धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेने मालेगाव शहरावर शोककळा पसरली आहे.