Malegaon Mayor Election
esakal
Malegaon Mayor Election : मालेगाव महानगरपालिकेचे महापौर पद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा इस्लाम पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. संख्याबळाच्या जोरावर इस्लाम पक्षाचाच महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात असून, त्यामुळे मालेगावची सत्ता पुन्हा एकदा शेख कुटुंबीयांच्या घरातच राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.