MNREGA Rural Employment
sakal
मालेगाव: ग्रामीण भागातील मजुरांना शंभर दिवस काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू आहे. यात शासनाची फसवणूक होऊ नये, तसेच बोगस मजूर दाखवून अनुदान लाटले जाऊ नये, या हेतूने राज्य सरकारने राज्यभरात ऑक्टोबर २०२५ पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मालेगाव तालुक्यात नोंदणीकृत सुमारे दोन लाख मजूर आहेत. यात ३९ हजार मजुरांची ई-केवायसी झाली आहे.