मालेगाव- शहरातील दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावून २३ दुचाकीसह दोघा चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्या विरोधात कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. येथील कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत भाऊसाहेब उत्तम चव्हाण (वय ३६, रा. सोयगाव) हा डीके चौक येथे चोरीचा दुचाकी विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली. श्री. पाटील यांनी पथक तयार केले.