Malegaon Lift Accident : मालेगावात थरार! महापालिकेची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली; माजी आमदारासह २० जण थोडक्यात बचावले

Lift Accident at Malegaon Municipal Corporation : लिफ्टची क्षमता दहा सदस्यांची असताना त्यात तब्बल वीस जण बसले. त्यामुळे जादा भार झाल्याने चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट कोसळली. त्यानंतर एकच धावपळ उडाली.
Lift Accident

Lift Accident

sakal 

Updated on

मालेगाव: येथे महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सभागृहातून माजी आमदार आसिफ शेख हे समर्थकांसह लिफ्टने खाली जाण्यास निघाले. लिफ्टची क्षमता दहा सदस्यांची असताना त्यात तब्बल वीस जण बसले. त्यामुळे जादा भार झाल्याने चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट कोसळली. त्यानंतर एकच धावपळ उडाली. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी शेख यांच्यासह आठ पत्रकारांना बाहेर काढल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com