Malegaon Politics : मालेगावात सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण; भाजप-काँग्रेसची 'भारत विकास आघाडी' तीन दिवसांतच फुटली, बहुमतासाठी किती जागांची गरज?

BJP and Congress Take Disciplinary Action : मालेगावात भाजप-काँग्रेसची तीन दिवसांची आघाडी फुटली असून पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली आहे. दुसरीकडे, इस्लाम पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या 'सेक्युलर फ्रंट'ने ४३ नगरसेवकांच्या पाठिंब्यासह बहुमताचा आकडा गाठला आहे.
Malegaon Municipal Corporation

Malegaon Municipal Corporation

esakal

Updated on

मालेगाव : महापालिका निवडणुकीनंतर (Malegaon Municipal Corporation) मालेगावच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण मिळाले असून, भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये झालेली भारत विकास आघाडी अवघ्या तीन दिवसांतच फुटली आहे. देशपातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या या दोन्ही पक्षांच्या स्थानिक आघाडीवर पक्षश्रेष्ठींनी तीव्र नाराजी व्यक्त करीत थेट कारवाई केली. परिणामी, भाजपमध्ये दोन नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार झाला असून, काँग्रेसने आपल्या महानगराध्यक्षांची हकालपट्टी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com