Malegaon Municipal Election
sakal
मालेगाव: येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सात निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. आयुक्त रवींद्र जाधव मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असतील. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तीन प्रभागांची जबाबदारी आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदतीला आहेत.