Malegaon Municipal Election Results
esakal
Malegaon Municipal Election Results 2026 : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी आपले प्रतिनिधी म्हणून अनेक नवे चेहरे सभागृहात पाठविले आहेत. व्यक्तीगत टिकांवर भर न देता विकासाच्या मुद्यावरील प्रचार मतदारांना भावला. यातूनच पश्चिम भागात शिवसेनेने तर पूर्व भागात इस्लाम पक्षाने मुसंडी मारली. महानगरपालिकेच्या इतिहासात १८ जागा जिंकत मालेगावच्या राजकारणात आपणच किंग असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दाखवून दिले.