Malegaon Municipal Election Result 2026 Won Candidate : मालेगावात मोठा राजकीय उलटफेर; महापालिकेत कुणाची बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Malegaon Municipal Election Results 2026 Overview : मालेगाव महापालिका निवडणुकीत सेक्युलर फ्रंटने आघाडी घेतली असून शिवसेनेने दमदार कामगिरी केली, तर एमआयएम आणि भाजपला मोठा फटका बसला.
Malegaon Municipal Election Result

Malegaon Municipal Election Result

esakal

Updated on

Malegaon Election Results : येथील महानगरपालिका निवडणुकीत २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक विजयी झाले असून माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पक्ष सर्वाधिक ३५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टी यांची युती यशस्वी ठरली असून समाजवादी पार्टीला सहा जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर लढणाऱ्या एमआयएम ला २१ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना ने १८ जागा जिंकत चांगली कामगिरी केली, तर कॉंग्रेस ला तीन आणि भाजप ला केवळ दोन जागा मिळाल्या.

इस्लाम पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचल्याने पुन्हा शेख कुटुंबातील सदस्याला महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतमोजणी कॅम्प रस्त्यावरील धान्य गोदाम, आयएमए हॉल, शिवाजी जिमखाना आणि मोतीबाग नाक्यावरील कृष्णा लॉन्स येथे झाली. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल स्पष्ट झाले.

या निवडणुकीत माजी महापौर ताहेरा शेख, अब्दुल मलीक, माजी उपमहापौर नीलेश आहेर, नरेंद्र सोनवणे, समाजवादी पार्टीच्या नेत्या शानेहिंद निहाल अहमद आणि कॉंग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग हे प्रमुख विजयी उमेदवार ठरले. तर भाजपचे नेते सुनील गायकवाड, भाजपचे महानगरप्रमुख देवा पाटील, माजी नगरसेवक गुलाब पगारे, बाळासाहेब आहिरे आणि माजीद हाजी यांचा पराभव झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com