

Ajit Pawar Launches Campaign for Malegaon Nagar Panchayat Election
Sakal
माळेगाव : मुख्यमंत्री फडणविस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात लोकाभिमुख कामे होत आहेत. या सरकारमध्ये मी अर्थमंत्री आहे. माळेगाव नगरपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्ते, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व सांडपाण्याची व्यवस्था आदी कामांसाठी साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर केला. अर्थात माळेगाव नगरपंचायत राज्यात प्रथम क्रमांकाची आदर्शवत बनवायची आहे. हे ध्येय साध्य करताना भाजप मित्रपक्षांना बरोबर घेण्याचे मी ठरविले. त्यामुळे भाजप नेते रंजन तावरे यांच्याबरोबर युती केली. माळेगावकरांनी कोणतीही शंका मनात न ठेवता नगराध्यक्षांसह १८ नगरसेवकांना विजयी करा, मी तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.