Navratri Festival Preparations in Malegaon : मालेगावात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पूजा सामग्रीने गजबजली आहे. देवीच्या मूर्तींना अंतिम रंगकाम केले जात असून, भाविक उत्साहात खरेदी करताना दिसत आहेत.
मालेगाव कॅम्प: शहर व परिसरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सोमवार (ता. २२)पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पूजेच्या साहित्य सामग्रीसह घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे.